मुंबई हल्ल्याबाबत ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडी, Why hasn`t Mumbai attacks trial started yet: Obama asks Sharif

मुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी

मुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.

मुंबईतल्या २६-११च्या हल्ल्याचा पाकिस्तानात सुरू असलेला खटला पुढे का सरकत नाहीये, असा सवाल ओबामांनी केला. तसंच जमात उद दवाचा दहशतवाद, भारतात होत असलेली घुसखोरी यावर कारवाई करण्यासही ओबामांनी बजावलंय.

वॉशिंग्टनमध्ये ओबामा आणि शरीफ यांची सुमारे २ तास चर्चा झाली. भारत-पाकिस्तानात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी शरीफ योग्य मार्गावर जात असल्याचं ओबामांनी या भेटीनंतर सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, October 24, 2013, 14:49


comments powered by Disqus