का करतात वाघ नाइट शिप्ट?, why tiger do night shift?

का करतात वाघ नाइट शिफ्ट?

का करतात वाघ नाइट शिफ्ट?

www.24taas.com, न्यू यॉर्क
वाघांसाठी जंगलातील साधन संपत्तीचा मानवाने त्याग करायला हवा, परंतु अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक नील कार्टर यांच्या मते जर वाघांसाठी जंगलाची जागा सोडायचा निर्णय घेतला तर वाघ किंवा मानवापैकी एकच जण वाचू शकतो.


हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या चितवन पार्कमध्ये १२१ वाघांचे घर आहे आणि तेथेही मानवाने आक्रमण केले आहे. लोक लाकूड आणि गवतासाठी तेथील जंगलावर अवलंबून आहेत. तेथील संशोधक नील कार्टर यांनी पार्कातील हालचाल टिपणार्या कॅमेर्यांहच्या मदतीने दोन वर्षे संशोधन केले.


तेव्हा त्यांना आढळले की, वाघ आणि माणसे ही एकाच रस्त्याचा जंगलात जाण्यासाठी वापर करतात हे उघड झाले आहे. फरक केवळ एवढाच होता की, माणसे सहसा रात्री जंगलात जात नाहीत आणि वाघांसाठी हा संकेत ठरतो आणि रात्री वाघ जंगलात आपली शिकार व इतर हालचाली करतो.


पारंपरिक समजुतीनुसार वाघ सहसा रात्र आणि दिवसांचा भेद न करता जंगलात बिनधास्त संचार करीत असतो, परंतु मानवी आक्रमणामुळे आता त्याला नाईट शिफ्ट करावी लागत आहे.

First Published: Monday, September 10, 2012, 19:02


comments powered by Disqus