Will iran President Sentenced to 74 flogged!

राष्ट्रपतींना मिळणार ७४ चाबकाचे फटके!

राष्ट्रपतींना मिळणार ७४ चाबकाचे फटके!
www.24taas.com, झी मीडिया, तेहरान

देशाच्या निवडणूक नियमांचं उल्लंघन करणाच्या आरोपाखाली राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांना ७४ चाबकाचे फटक्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

इरान सरकारच्या प्रवक्त्यानं मात्र या शक्यतेला फेटाळून लावलंय. इरानमध्ये १४ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अहमदीनेजाद यांचा सहकारी इस्फंदियार रहीम माशाई उमेदवार म्हणून आपलं नाव नोंदवण्यास गेले तेव्हा अहमदीनेजाद त्यांच्याच सोबत होते. अशी बातमी ब्रिटनच्या एका वर्तमानपत्रानं दिली होती.

इरानच्या वरिष्ठ मुल्ला-मौलवींद्वारे संचालित एक संवैधानिक संस्था ‘गार्जियन काऊन्सिल’ अहमीदनेजाद यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याची मागणी करू शकते.

दरम्यान, सरकारचे प्रवक्ते गुलाम-हुसैन इलहाम यांच्या म्हणण्यानुसार, ‘राष्ट्रपतींनी कोणत्याही निवडणूक नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. कारण, ते उमेद्वारांच्या नोंदणीवेळी एका सामान्य व्यक्ती म्हणून उपस्थित होते... देशाचे नेते म्हणून नाही’.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013, 16:51


comments powered by Disqus