Last Updated: Saturday, February 15, 2014, 12:35
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन अमेरिकेत पुन्हा एकादा वादळाचा तडाखा बसला आहे. याआधी जोरदार बर्फसृष्टी झाली होती. हिवाळी वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने शुक्रवारी २१ जणांचा बळी गेला.
या वादळामुळे सुमारे पाच लाख घरांमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. फिलाल्डेफिया, पेनिस्लेविया या प्रांतांना हिवाळी वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. तर, न्यूयॉर्कमध्ये एका गर्भवती महिलेचा थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
या वादळाचा हवाई वाहतुकीवरही परिणाम दिसून आलाय. अनेक उड्डाणे रद्द् करण्यात आली आहेत. या वादळामुळे न्यूयॉर्कमध्ये ५ सेंटीमीटरपर्यंत बर्फाचे थर साचले आहेत. प्रचंड थंडी पडली असून अनेक जण गारठले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 15, 2014, 12:35