Last Updated: Tuesday, July 9, 2013, 18:34
www.24taas.com, झी मीडिया, बेनिनजगात रोज काही ना काही विचित्र घटना घडत असतात. काही गोष्टींवर तर विश्वास ठेवणेही कठीण असते. नायजेरियामध्ये अशीच एक आश्चर्यरकारक घ़टना घ़डलीय. तिथे एका महिलेने चक्क एका घोड्याच्या बाळाला जन्म दिलाय.
जन्माला आलेले बाळ कोणत्याही प्रकारे माणसासारखे दिसत नाही. या बाळाचे डोके हे घोड्यासारखे तर त्याला चार पाय हे खुर असलेले होते. जेव्हा हे बाळ जन्माला आले तेव्हा सगळेचजण हैराण झाले.परंतु बाळाच्या जन्मानंतरच काही वेळेतच त्याचा मृत्यू झाला.
चर्चमध्ये उपस्थित असलेल्या लोकांकडून असं समजण्यात येतंय की, जेव्हा चर्चमध्ये प्रार्थना सुरु होती तेव्हा तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि त्यानंतर थोड्याच वेळात तिने एका विचित्र बाळाला जन्म दिला. चर्चचे प्रमुख अधिकारी इवांजेलिस्ट सिल्वा वेल्थथ यांच्यामते या बाळाची आईही आपल्या मुलाला पाहून हैराण झाली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 9, 2013, 18:33