अमेरिकेवर शट डाऊनचं संकट! World holds breath as US government shutdown imminent

अमेरिकेवर शट डाऊनचं संकट!

अमेरिकेवर शट डाऊनचं संकट!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अमेरिकेची अर्थव्यवस्था ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीये. महासत्ता आर्थिक संकटात सापडलीये. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधयकाला रिपब्लिकनांचा विरोध सुरुच असल्यानं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये.

सिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी न मिळाल्यास अर्थव्यवस्थाच ठप्प पडण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचं नवीन आर्थिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरु होतं. तत्पूर्वी या आरोग्य विधेयकाला मंजुरी मिळणं गरजेचं होतं. मात्र या विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्या अद्याप करण्यात आल्या नसल्यानं रिपब्लिकनांनी विधेयकाच्या बाजून मतदान करण्यास नकार दिलाय.

विधेयक मंजूर न झाल्यास ३३ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल. अमेरिकेवर हे शट डाऊनचं संकट ओढावलं तर तब्बल ८ लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.

याआधी १९९५मध्ये २८ दिवसांसाठी शट डाऊन घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रपतीपदी बिल क्लिंटन होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 09:01


comments powered by Disqus