भारतीय योग गुरूंवर लैंगिक शोषणाच्या आरोपाने खळबळ Yoga Guru Bikram Chowdhery in controversy

भारतीय योग गुरूंवर लैंगिक शोषणाच्या आरोपाने खळबळ !

भारतीय योग गुरूंवर लैंगिक शोषणाच्या आरोपाने खळबळ !
www.24taas.com, वॉशिंग्टन

विक्रम योगचे संस्थापक आणि योग गुरू विक्रम यांच्यावर त्यांच्या विदेशी शिष्येने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने वादात अडकले आहेत. २९ वर्षीय सारा बॉन या शिष्येने आपल्यावर शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.

योग गुरू विक्रम चौधरी यांनी एक आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळण्यात आणि योग शिकवण्यास साराला मनाई केली. बॉनने सांगितलं, की तिला पारितोषिक आणि योग प्रशिक्षणाच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्याची मागणी विक्रम चौधरींनी केली. यासाठी आपल्या दोघांचे पुर्वजन्मापासून शऱीर संबंध आहेत, अशी बनवाबनवीची कारणंही दिली.


साराने वारंवार नकार दिल्यावर अखेर एक दिवस ही गष्ट आपल्या बॉयफ्रेंडला सांगितली. तरीही विक्रम चौधरी सारा बॉनचं लैंगिक शोषण करतच राहिले. २००७, २००८ या वर्षांमध्ये सारावर सेक्स साठी विक्रम चौधरींनी दबाव टाकला. विक्रम चौधरी हे विदेशातील नामांकित व्यक्तिमत्व आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन, रोनाल्ड रीगन, बिल क्लिंटन यांना बिक्रम चौधरींनी योग प्रशिक्षण दिलं आहे.

First Published: Wednesday, March 27, 2013, 17:38


comments powered by Disqus