आता सेकंदाला बदलणार कपडेही रंग!, your garment will change color every second

आता सेकंदाला बदलणार कपडेही रंग!

आता सेकंदाला बदलणार कपडेही रंग!

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

मिनिटा-मिनिटाला आपला रंग बदलणारा सरडा पाहिलाय का हो तुम्ही... नक्कीच पाहिला असेल... पण, याचप्रमाणे तुमचे कपडेही आपला रंग बदलू लागले तर...?

ही केवळ कल्पना आहे असं नाही... कारण, बुडापेस्टच्या एका कपडा डिझायनरनं, सेकंदाला रंग बदलू शकेल असा कपडा बनवल्याचा दावा केलाय. ज्युडिट एस्टर कारपॅटीच्या अध्यक्षतेखाली या कल्पनेमध्ये कपड्यांमध्ये आवाज आणि सेन्सर लावण्यात आलाय.

‘गिजमोडो’नं दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये 12 वोल्ट सप्लायसोबत एक आर्डुइनो आणि चार इंडस्ट्रीयल 24 व्होल्ट डीसी वीज सप्लाय नियंत्रित करणारे 20 कस्टम पिंट्रिड सर्किट बोर्डचा समावेश केला गेलाय. निक्रोम तार असणाऱ्या टेक्सटाईल वूवनला ते गरम करू शकतील.

डिजिटल मीडियाच्या जगाला मी वस्त्रकलेत कसं घेऊन येऊ शकतो, हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो, असं कारपॅटी यांनी म्हटलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 20:33


comments powered by Disqus