Last Updated: Monday, May 13, 2013, 14:22
www.24taas.com, झी मीडिया,कराची पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या यशाबद्दल त्यांची पहिली पत्नी जेमाईमा ही खुश आहे. आपला हा आनंद तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
तहरीक ए इंसाफ या पार्टीला पख्तून विभागातून विजय मिळाला आहे. सध्या लंडनमध्ये वास्तव्याला असलेली जेमाईमाने ट्विट केलं आहे की, ‘तहरीक ए इंसाफ या पार्टीचा हा खूप मोठा विजय आहे. ज्याला कधी काळी संसदेत एकच जागा मिळत असे. एवढचं नाही तर ती पार्टी एका प्रातंतातून सत्तेतही आली आहे.’
जेमाईमाने त्यांची मुलं सुलेमान आणि कासिम हे त्यांच्या बाबांचा जब्बा घालून बसले आहेत असंही त्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. जेमाईमा ही इम्रान खान यांची पहिली पत्नी आहे. १९९५ साली त्या दोघांचे लग्न झाले होते तर २००४सा त्यांचा घटस्फोटही झाला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 13, 2013, 14:22