Last Updated: Monday, April 21, 2014, 16:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन हा `मिर्जा साहिबान` या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगची सुरूवात सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
सुत्रांच्या सांगण्यानूसार हर्षवर्धन आपल्या अभिनयात पूर्णपणे लक्ष देत आहे. तसेच आपली भूमिका अंगीकारण्यासाठी सध्या एका भाडेतत्वावरच्या घरात राहत आहे. हर्षवर्धन आपल्या भूमिकेतील भाषेतच सध्या सर्वांशी बोलत आहे.
सिनेमाच्या तयारीत हर्षवर्धन इतका व्यस्त आहे की त्याने पार्टीमध्ये जाणं, मित्रांसोबत फिरणं इतकंच काय स्वत:च्या घरघूती समारंभात जाणं देखील सोडून दिलं आहे. सिनेमात हर्षवर्धन दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
हर्षवर्धनने नसीरुद्दीन शाह यांच्या शाळेतून अभिनयाचे गुण आत्मसाद केले आहेत. `मिर्जा साहिबान` सिनेमाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 16:41