`एनी बडी कॅन डान्स 2`मध्ये हॉट जलवा, Any body can dance 2 new hot couple

`एनी बडी कॅन डान्स 2`मध्ये हॉट जलवा

`एनी बडी कॅन डान्स 2`मध्ये हॉट जलवा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये आता नव्याने डान्यचा जलवा पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केल्यानंतर `आशिकी 2`ची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही वरूण धवनसोबत झळकणार आहे. या कारणाने श्रद्धा कपूर आणि वरूण धवन ही एक नवी हॉट जोडी `एनी बडी कॅन डान्स 2`च्या माध्यामातून एकत्र काम करण्यासाठी तयार झाले आहेत.

`आशिकी 2` हा सिनेमा 2013 मध्ये चांगलाच गाजला होता. या सिनेमाची गाणी तरूणाईवर राज्य करत होती.

आता मात्र श्रद्धा कपूर हूी रेमो डीसुजाच्या `एनी बडी कॅन डान्स 2` या सिनेमात आपला जलवा दाखवणार आहे. रेमोच्या या सिनेमात प्रभू देवादेखील मुख्य भूमिकेत दिसेल. प्रभु देवाने याआधी देखील रेमोच्या `एनी बडी कॅन डान्स` या सिनेमात मुख्य भूमिका केली होती. हा सिनेमा पुर्णपणे डान्सवर आधारीत होता.

वरूण धवन या सिनेमासाठी डांन्सचं चांगलच प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणात वरूणने अनेकवेळा स्वतःला जखमी करून घेतल आहे. या सिनेमाच शुटींग लास वेगास येथे होइल आणि यात १० गाणी असणार असल्याची माहिती काही सुत्रांकडून मिळाली आहे. आपल्या नावाप्रमाणे `एनी बडी कॅन डान्स 2` हा सिनेमा देखील डान्सलाच समर्पित करण्यात आला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 20:07


comments powered by Disqus