Last Updated: Friday, June 28, 2013, 18:25
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली आराध्याच्या जन्मानंतर मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा आनंद जणू काही गगनात मावेनासाच झालेला आहे. आराध्या या वर्षी नोव्हेंबरला २ वर्षांची होणार असून ऐश्वर्या, अभिषेक तसेच आजोबा अमिताभ बच्चन तिच्या शाळेच्या तयारीला लागले आहेत. तिच्यासाठी सर्वात चांगल्या अशा प्लेग्रुपच्या शोधात बच्चन कुटुंबिय लागले आहेत. शेवटी काय तर बच्चन कुटुंबियाची सर्वात लाडकी नात असल्याने हे तर होणारच.
अमिताभ बच्चनची नात असल्याने तिला एका सेलिब्रिटीचं महत्व आहे. यापूर्वीही नवजात आराध्याला तंत्रज्ञानाची असलेली समज यामुळेही ती चर्चेत होती. आराध्याकडून आयपॅड हाताळण्याचा अंदाज आपल्याला आल्याचे आजोबा अमिताभ बच्चन यांनी सांगितले.
बच्चन कुटुंबियांना आराध्या आता शाळेत जाण्यास योग्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळेच येत्या नवीन वर्षात शाळेत प्रवेश घेण्यासाठी बच्चन कुटुंबियांची शाळा शोध मोहिम सुरु झाली आहे. आराध्या आता प्ले स्कूल मध्ये जाऊ शकते, आपल्या वयाच्या इतर मुलांबरोबर ती खेळू शकते, त्यांच्याशी बोबड्या भाषेत संवाद साधू शकते, या सगळ्याचा विचार करूनच तिच्यासाठी सगळ्यात उत्तम शाळा शोधण्याच्या तयारीत बच्चन कुटुंबिय सज्ज झाले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 28, 2013, 18:25