मिसेस इंडिया मुंबईची पूजा पाटील-ठाकूर, Beautiful Mrs. India competition, Pooja Patil - Takur

मुंबईची पूजा पाटील-ठाकूर मिसेस इंडिया

मुंबईची पूजा पाटील-ठाकूर मिसेस इंडिया
www.24taas.com,मुंबई

मिसेस इंडिया सौंदर्यवती स्पर्धेत मुंबईची पूजा पाटील-ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. आता ती मिसेस इंटरनेशनल ऑल नेशन्स या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

चेन्नई येथील रशियन सेंटर येथे अलिकडेच झालेल्या मिसेस इंडिया सौंदर्यवती स्पर्धेत पूजा पाटील-ठाकूर हिने यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच त्यांना मिसेस पर्सनॅलिटी हे सबटायटल देऊनही गौरविण्यात आले.

पूजाबरोबर छत्तीसगड येथील अफरोज खान यांनीही बाजी मारलेय. मलेशिया येथे दि. १३ ते १७ जून रोजी होणार्या मिसेस एशिया इंटरनेशनल-२0१३ या स्पर्धेमध्ये त्या दोघी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पूजा मिसेस इंटरनेशनल ऑल नेशन्स तर अफरोज मिसेस इंटरनेशनल ग्लोब या स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे लक्ष लागलं आहे.

First Published: Tuesday, April 23, 2013, 17:14


comments powered by Disqus