Last Updated: Friday, April 11, 2014, 17:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रमोशन संपल्यानंतर एका लहान मुलीने अमिताभ यांना एक लहानसं `गिफ्ट` आणून दिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे `गिफ्ट` तीने अमिताभसाठी नाही, तर आराध्या बच्चनसाठी अमिताभकडे दिलं.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या गोष्टीची माहिती दिली. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये एका पिंक ड्रेस मधील लहान मुलीचा उल्लेख केला. ब्लॉगमध्ये सांगताना अमिताभ लिहतात ‘एक सुंदर लहान मुलगी गर्दीतून बाहेर येऊन माझ्या जवळ आली. तिच्या हातात एक `गिफ्ट` होतं, जे आराध्यासाठी होतं. तीने हट्ट केला की, ती मला `गिफ्ट` खोलून दाखवणार. तीने `गिफ्ट` उघडलं आणि माला त्या `गिफ्ट` बद्दल माहिती दिली. नंतर तीने `गिफ्ट` पुन्हा चांगल्या प्रकारे बंद केलं आणि माझ्या हातात देऊन, ते `गिफ्ट` आराध्याच्या हातात द्यायला सांगितलं.
अमिताभ यांना लहान मुलांसोबत राहण्यास आवडते. ते खूप चांगले असतात. असा अमिताभ यांनी ब्लॉग मध्ये उल्लेख केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 11, 2014, 17:12