बृहन्महाराष्ट्र मंडळाचे जुलैमध्ये अधिवेशन, BMM 16th Convention July 5-7th, 2013

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे जुलैमध्ये अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे जुलैमध्ये अधिवेशन
www.24taas.com, बोस्टन

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.) १६ वे अधिवेशन जुलै महिन्यात अमेरिकेत होणार आहे. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तर प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे.

साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट, आणि क्रीडा या क्षेत्रातले मान्यवर १६ व्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. तर `विक्रमवीर` प्रशांत दामले यावेळी वेगळ्या भूमिकेत असणार आहे. गायक-अभिनेत्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, ते खुल्या गप्पांमधून रसिकांसमोर मांडतील. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचीही मुलाखत होणार आहे. ही मुलाखत स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी घेतील.

या अधिवेशनात अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, अजित भुरे, अद्वैत दादरकर यांचे `फॅमिली ड्रामा` हे नाटक होईल. तर राहुल देशपांडे यांचे `संगीत मानापमान` यावेळी सादर होणार आहे. बी.एम.एम. सारेगम २०१३ या संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा या अधिवेशनात होणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचलन अभिनेत्री प्रिया बापट करणार आहे. या सोहळ्यात प्रशांत दामले `स्पेशल गेस्ट` आहे. अधिक माहिती www.bmm2013.org आणि www.facebook.com/bmm2013 वर मिळेल, असे मंडळाने कळविले आहे.

First Published: Wednesday, February 20, 2013, 20:22


comments powered by Disqus