दीपिका-रणवीरचं "चोरी चोरी, चुपके चुपके"! Deepaka and Ranvir is dating

दीपिका-रणवीरचं `चोरी चोरी, चुपके चुपके`!

दीपिका-रणवीरचं `चोरी चोरी, चुपके चुपके`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह‍ यांचं नक्की काही तरी सुरु आहे. अगदी आताच या दोघांना मुंबईच्या ऑलिव रेस्टॉरंटमध्ये पाहण्यात आलं होतं. खरं तर हे दोघंही कधीपण एकमेकांना डेट केल्याचं मान्य करत नाही.

रणवीर-दीपिका रेस्टॉरंटमध्ये एकत्रपणे एक चांगला वेळ घालवण्यासाठी आले होते. दोघांनीही डेनिम जिन्स आणि सफेद टी-शर्ट घातलं होतं. कॅमेराला पाहून दीपिका तर यापासून लपताना दिसली, पण रणवीर मात्र स्वत:ला पोज देण्यापासून थांबवू शकला नाही. रणविरने डोक्यावर ग्रे कलरची टोपी घातली होती. या टोपीमध्ये रणवीर आजकल नेहमीच कुठेतरी दिसत असतो.

रणवीर आणि दीपिका ही जोडी संजय लीला भंसालीच्या आगामी सिनेमात म्हणजेच `बाजीराव मस्‍तानी`मध्ये एकत्र दिसणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 12:48


comments powered by Disqus