चाहत्यांच्या प्रेमात पडलीयं दीपिका पदुकोण deepika padukon loves fan

चाहत्यांच्या प्रेमात पडलीयं दीपिका पदुकोण

चाहत्यांच्या प्रेमात पडलीयं दीपिका पदुकोण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री दीपिका पदुकोण चाहत्याचं प्रेम आणि त्यांनी दिलेली दाद यातचं स्वत:च आनंद मानते. दीपिकाला २०१३ मधील इंडस्ट्री क्वीन समजलं जातायं.

रेस २, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्सप्रेस आणि गोलियों की रासलीला रामलीला यासारखे अनेक चित्रपट दीपिकाने सुपरहिट केले.

या बाबत दीपिका म्हणतेयं की, "मला खूप छान वाटतं मात्र लोकांनी मला नंबर वन अभिनेत्री बोलावं असा त्याचा अर्थ होत नाही. या सर्व गोष्टी मला खूप आनंद देतात. चाहत्यांचं प्रेम आणि दाद हे माझ्यासाठी लक्षणीय आहे."

`अन्य अभिनेत्री माझ्याबद्दल काय विचार करतात, यांचा मी विचार करत नाही. प्रत्येक जण स्वच्या जीवनात व्यस्त आहेत. मी इतरांकडे ते काय करत आहेत यांचा विचार करत नाही.", असेही दीपिका म्हणाली. लवकरच दीपिका आगामी चित्रपट फाईडिग फेनी फर्नांडीस आणि हॅप्पी न्यू ईयरमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 12, 2014, 17:21


comments powered by Disqus