गोविंदाच्या मुलीनं तीन वर्षात चक्क ३० सिनेमे नाकारले govinda`s girl rejects 30 movies in 3 years

गोविंदाच्या मुलीनं तीन वर्षात चक्क ३० सिनेमे नाकारले

 गोविंदाच्या मुलीनं तीन वर्षात चक्क ३० सिनेमे नाकारले
www.24taas.com, झी मीडिया, फ्लोरिडा

आपल्या मुलीनं तीन वर्षात चक्क ३० सिनेमे नाकारले आहेत, असा दावा फिल्म स्टार गोविंदाच्या पत्नीनं केला आहे. सध्या गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता हे अमेरिकेत फ्लोरिडाच्या `टेम्पा बे`मध्ये इंटरनॅशनल इंडियन फिल्‍म अॅकेडमी म्हणजेच `आयफा`मध्ये सहभागी होण्यासाठी गेले आहेत.

पत्रकारांशी बोलताना सुनिता म्हणाल्या की, `नर्मदानं गेल्या तीन वर्षात तीस सिनेमे नाकारले आहेत. नर्मदाला गोविंदा सारखंच विनोदी सिनेमात काम करायचं आहे. यासाठी काही दिग्दर्शकांशी बोलणं सुरू आहे. बघुया पूढे काय होते`.

सुनिता पूढे म्हणाल्या, `नर्मदाला कोणत्याही दबावात काम करायचं नाही आहे. हे खरं आहे की, ती एका फिल्म स्टारची मुलगी असल्याने तिच्याकडून अपेक्षा या जास्त असणार आहे. कदाचित तिची तुलना ही गोविंदाशी देखील होईल`.

गोविंदा बद्दल बोलताना सुनिता म्हणाल्या की, `गोविंदा नेहमीच सिनेमा निवडताना माझ्याशी सल्ला घेतो. जर का सिनेमाची कथा मला पसंत नसेल, तर गोविंदा तो सिनेमा करत नाही. आमचे विचार जुळतात. मी आणि गोविंदा गेली ३० वर्ष एकत्र आहोत. गोविंदा हा घरात उत्तम नवरा, वडील आणि मुलाची भूमिका पूर्ण करतो`, अशा शब्दांत सुनिताने गोविंदाची स्तुती केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 14:38


comments powered by Disqus