मला नकोय झीरो फिगर, अशीच बरीय- किरदिशीया, I doesn`t want to zero figure

मला नकोय झीरो फिगर, अशीच बरीय- किरदिशीया

मला नकोय झीरो फिगर, अशीच बरीय- किरदिशीया
www.24taas.com, लंडन

ख्लोए करदिशिया आपल्या कमी-वाढत्या वजनामुळे आणि आपल्या बहिणी किम व कटर्नी यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या तुलनेने नक्कीच चिंतेंत असते. मात्र ती हे पण सांगते की, ती तिची फिगर कधी साईज झीरो असावी यासाठी अजिबात प्रयत्न करीत नाही.

ख्लोएचं म्हणणं आहे की, तिच्या वाढत्या वजनामुळे तिला असुरक्षितता वाटते. मात्र जीवनातील आनंद घेण्यासाठी या गोष्टीला ती तितकसं महत्त्व देत नाही.

ख्लोए कॉस्मोपॉलिटनच्या मासिकाच्या कव्हर पेजवर आपल्या दोन्ही बहिणींसोबत झळकणार आहे. जर मी झीरो फिगर नाही तरी यात काहीही काळजीचं कारण नाही. माझी साईज झीरो असावी अशी माझी अपेक्षा नाही. मला माझ्या शरीरावर प्रेम आहे. आणि मी अशीच खूप हॉट दिसते त्यामुळे मला काळजी करण्याचं कारणच नाही.

First Published: Thursday, November 8, 2012, 13:10


comments powered by Disqus