Last Updated: Friday, April 25, 2014, 12:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचे फेमस कपल काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा आता मोठी झाली आहे. हल्लीच तीने आपला फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला आहे. न्यासा आता ११ वर्षांची झाली आहे. सध्या न्यासा जास्त करून फेसबुकवर ऑनलाईन दिसते. तीने फेसबुकवर आपला फोटो अप केलाय. त्यानंतर तू आई (काजोल) सारखी दिसतेस, अशा कमेंट पोस्ट होत आहेत.
फेसबुकवरचा न्यासाचा फोटो हा गंभीर दिसतोय. या कारणानेच न्यासाही अभ्यासात हुशार असेल, असे काही जाणकारांचे मत आहे. न्यासाचा जन्म हा २००३ साली झाला होता. यानंतर काजोल सिनेमात काम करणं अगदीच कमी केलं. न्यासाच्या जन्मानंतर काजोल फना, यू मी और हम, माय नेम इज खान, वी आर फॅमिली आणि टूनपुर का सुपरहीरो या सिनेमात झळकली होती.
सिनेमात काम कमी करण्याबाबत काजोलने आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याच कारण दिलं होत. अपल्या मुलांची चांगली देखभालं व्हावी यासाठी काजोल नेहमीच त्यांची काळजी घेत असते. मात्र, आता तिची मुलगी न्यासा सोशलनेटवर्किंगच्या माध्यमातून भेटीला आली आहे, हे नक्की.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 25, 2014, 10:53