किंग खानने टाकले धोनीला मागे!, King Khan, Dhoni had already!

किंग खानने टाकले धोनीला मागे!

किंग खानने टाकले धोनीला मागे!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा देशातला सर्वात पॉवरफुल सेलिब्रेटी ठरला आहे. फोर्ब्स इंडिया २०१३ च्या सर्वात ताकदवर सेलिब्रेटींच्या यादीत किंग खानला लागोपाठ दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे. ४८ वर्षीय किंग खानला हा सन्मान त्यांच्या सुपर हिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या यशामुळे आणि लोकप्रियेतामुळे मिळाला आहे.

भारतीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या लोकप्रियेता आणि काही ब्रांडच्या जाहिरातीमुळे या यादीत गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानावरुन या वर्षी दुसऱ्या स्थानावर आला आहे. या उलट सलमान खान हा दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्यांच्या नंतर क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरचा या यादीत चौथा नंबर आहे.

बॉलिवूडचा बिग बीग अमिताभ बच्चन पाचव्या स्थानावर आहे. बिग बीग गेल्या वर्षी देखील याच स्थानावर होते. तसेच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सहाव्या क्रमांकावर आहे. यावेळी या यादीत करिना कपूर आणि भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग यादीतून गायब झाले आहेत. त्यांच्या जागेवर रणवीर कपूर आठव्या स्थानावर आणि हृतिक रोशन हा दहाव्या स्थानावर आला आहे. यावेळी या दोघांना पहिल्या दहा जणांमध्ये जागा मिळालेली आहे.

या यादीत कतरिना कैफ ही टॉप टेनमधील एकमात्र महिला आहे. तसेच या यादीत विराट कोहली हा सर्वात कमी वयाचा व्यक्ती आहे. रविन्द्र जडेजा २८ आणि शिखर धवन ३४ व्या नंबरावर या यादीत विराजमान आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 20:01


comments powered by Disqus