Last Updated: Monday, March 25, 2013, 08:45
www.24taas.com,मुंबईफेमिना मिस इंडिया २०१३ ची अंतिम फेरी रविवारी मुंबईत पार पडली. भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २३ सौदर्यवतींमध्ये मिस इंडियाच्या किताबासाठी चुरस पहायला मिळाली. यावेळी मिस इंडिया वर्ल्ड म्हणून पंजाबच्या नवनीत कौर ढिल्लनची निवड झाली.
मिस इंडिया अर्थ ठरली विषाखापट्टणमची सोभिता डुलीपाला तसंच मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जोया अफरोजनं मान पटकावला. चित्रंगदा सेन, करण जोहर, जॉन अब्राहम हे बॉलिवूड सेलिब्रिटी यावेळी ज्युरी मेमंबर म्हणून हजर होते.
तसंच यावेळी बिपाशा बासू, असीन, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, युवराज सिंग आणि फॅशन डिझायनर रितू कुमार या सेलिब्रिटींनी या फायनलला आवर्जून हजेरी लावली.
First Published: Monday, March 25, 2013, 08:45