Last Updated: Thursday, February 28, 2013, 21:26
www.24taas.com, पुणेज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव किर्लोस्कर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. किर्लोस्कर प्रकाशनच्या किर्लोस्कर, स्त्री या नियतकालिकांचं तसंच मनोहर या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं.
पत्रकारितेच्या कक्षा मर्यादित असताना त्यांनी प्रामुख्याने आर्थिक, सामाजिक विषयांवर लिखाण करुन पत्रकारीतेच्या कक्षा ख-या अर्थाने रुंदावल्या. महिलांचे प्रश्न तसंच जनसामान्यांना भेडसावणा-या समस्यांना त्यांनी वाचा फोडली. त्यांची मासिके म्हणजे सुसंस्कृत पत्रकारितेचा आदर्श मानली जायची.
त्यामुळे ख-या अर्थाने मुकुंदराव किर्लोस्करांच्या निधनामुळे एक बहुढंगी आणि अभ्यासू पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना पत्रकार वर्तुळातून व्यक्त करण्यात येतेय.
First Published: Thursday, February 28, 2013, 21:26