Last Updated: Monday, January 21, 2013, 10:48
www.24taas.com,पुणेआगामी काळात पाकिस्तानी कलाकारांचे भारतात स्वागत करता येणार नाही अशी भूमिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतलीय. दोन भारतीय जवानांची पाकिस्तानी सैन्याने निघृण हत्या केल्याने संतापलेल्या आशाताईंनी ही भूमिका घेतलीय.
`सूरक्षेत्र` या कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांबरोबर काम करण्याच्या मुद्द्यावरून अशा भोसलेंवर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आशाताईंची ही बदलेली भूमिका महत्वाची आहे.
भारतीय सैनिकांची सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेली हत्या हा पाकिस्तानचा भ्याडपणा आहे. भारतात आपण त्यांच्या कलाकारांचे चांगल्या भावनेने स्वागत करतो. येथे येऊन अनेक पाकिस्तानी कलाकार मोठे झाले, परंतु आपल्या भावनांचा त्यांच्याकडून योग्य सन्मान केला जात नाही, अशी खंत आशा भोसले यांनी व्यक्त केली.
र्हिादम डिव्हाईन एण्टरटेन्मेंट आणि अलायन्स एण्टरटेन्मेंट निर्मित आशा भोसले यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माई’ हा हिंदी चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आशा भोसले बोलत होत्या. चित्रपटाचे सहनिर्माते नितीन शंकर आणि सिनेमॅक्सचे नितीन वानखेडे यावेळी उपस्थित होते.
कलेला जाती आणि धर्माच्या बंधनामध्ये बांधू नये. मी गाणी ऐकण्यासाठी नव्हे, तर कलाकारांचा आवाज ऐकण्यासाठी रिऍलिटी शोमध्ये भाग घेते. आपण चांगल्या भावनेने पाकिस्तानी कलाकारांना आपलेसे करतो. आतापर्यंत तेथील अनेक कलाकार भारतात येऊन मोठे झाले, परंतु आपल्या भावनांचा योग्य आदर ते करत नाही, त्यामुळे त्यांचे स्वागत कशाला? असे आशा भोसले म्हणाल्या.
दुबईप्रमाणे कायदे करण्याची गरज आहे. कठोर शिक्षेशिवाय बलात्कार आणि स्त्री-भू्रण हत्या थांबणार नाहीत, त्यासाठी दुबईप्रमाणे कायदे केले पाहिजेत, असे मत आशा भोसले यांनी व्यक्त केले.
First Published: Monday, January 21, 2013, 08:43