प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ९० दिवस एकत्र Priyanka and Ranveer going on cruize

प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ९० दिवस एकत्र

प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ९० दिवस एकत्र

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवुडमधील नवीन दिग्दर्शिका झोया अख्तरच्या नवीन सिनेमात प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग आणि फरहान अख्तर हे एकत्र काम करणार आहेत. झोयाचा `दिल धड़कने दो` या सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होईल. यासाठी हे तीनही कलाकार ९० दिवस जहाजावर राहणार आहेत.

२००९ साली झोयाने `लक बाय चान्स` हा तिचा पहिला सिनेमा प्रदर्शित केला होता. आता `दिल धड़कने दो` हा सिनेमा घेऊन झोया पुन्हा आपली दिग्दर्शनाची कला लोकांसमोर मांडणार आहे. सांगण्यात येत आहे की, झोयाचा हा सिनेमा भावा बहिणींच्या नात्यावर अवलंबून आहे. या सिनेमाचं जास्त शुटींग हे जहाजावरच होईल.

१७ मे पासून या सिनेमाचं शुटींग स्पेनमध्ये सुरू होईल. यासाठी १३ मे पासून सर्व कलाकार स्पेनमध्ये जाणार आहेत. यावेळी ९० दिवस कलाकारांना जहाजावर रहावं लागेल. झोयाने सिनेमाचं शुटींग कसं करायचं याचं पुर्ण प्लॅनिंग केलं आहे.

या सिनेमात अनिल कपूर आणि अनुष्का शर्माच देखील काम करणार आहेत. सिनेमात प्रियंका चोप्राला रणवीर सिंगची मोठी बहीण म्हणून दाखवली जाणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ५ जून रोजी प्रदर्शित करण्यात येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 12:29


comments powered by Disqus