Last Updated: Tuesday, May 6, 2014, 17:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई चित्रपट निर्माता आदित्य चोप्राशी इटलीमध्ये गपचूप लग्न केल्यावर बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा भारतात परतली आहे. ३ मे रोजी राणी भारतात परतत असताना तिचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. राणीने यावेळी निळ्या रंगाचे टीशर्ट त्यावर लाल जॅकेट आणि जिन्स घातलेली दिसत होती.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा हे दोघेही माध्यमांना समोर जाता येऊ नये, या कारणाने वेगवेगळ्या फ्लाइटने मुंबईत परतले. तसेच चोप्रा कुटुंबाने आपल्या बंगल्याभोवती असलेल्या एक मोठ्या भिंतीला सफेद पडद्याने झाकलं आहे.
या कारणाने छायाचित्रकारांना कोणतीही गोष्ट घरातील टीपता येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. लग्नानंतर आता पर्यंत कोणालाही राणी आणि आदित्यला कॅमेरात क्लिक करता आलेले नाही.
मुंबईत चोप्रा कुटुंबाने लग्नाच्या निमीत्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत करण जोहर, अनुपम खेर, किरण खेर, वैभवी मर्चण्ट आणि अन्य काही सेलिब्रेटी उपस्थित होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 6, 2014, 17:22