Last Updated: Wednesday, April 30, 2014, 13:35
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली उत्तम सायंस फिक्शन, हाय क्वॉलीटी विजुअल ग्राफिक्स आणि दमदार स्टारकास्टला घेऊन बनवलेला स्पायडरमॅन-2 आज भारतात रिलीज होत आहे. भारतात खरंतर स्पायडरमॅनचे फॅन्स खूपच आहेत. या आधीपण स्पायडरमॅन भारतात सुपरहिट गेला होता. याच कारणाने स्पायडरमॅन-2 हा सिनेमा अमेरिका आधीच भारतात रिलीज होत आहे. अमेरिका आणि इतर युरोपीयन देशात हा सिनेमा 2 मे रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
या सिनेमाच्या हिंदी डबिंगमध्ये विलनचा आवाज विवेक ओबेरॉयने दिला आहे. विवेक ऑबेरॉयने जेमी फॉक्सच्या इलेक्ट्रो या भुमिकेला आवाज दिला आहे. या साठी विवेकने खूपच मेहनत घेतल्याचे बोलले जात आहे. विवेक हा जेमी फॉक्सचा खूपच मोठा चाहता आहे. या कारणानेच विवेकने हिंदी डबिंगचं काम केलं आहे.
या सिनेमात एक हिंदी गाणं प्रमोशनसाठी भारतात लाँच करण्यात आलं आहे. हे गाणं सध्या यू ट्यूबवर चांगलच गाजतेय. हे गाणं सनम बँडच्या सनम पुरीने कंपोज केलं आहे. या आधीच्या सिनेमात देखील सनम बँडने स्पायडरमॅन सिनेमासाठी गाणं कंपोज केलं होत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 13:35