सनी लियॉन झाली घायाळ, पडली प्रेमात... , Sunny leone in Mumbai

सनी लियॉन झाली घायाळ, पडली प्रेमात...

सनी लियॉन झाली घायाळ, पडली प्रेमात...
www.24taas.com , मुंबई

सनी लियॉन प्रेमात पडलीय... काय ऐकून खरं वाटतं नाही... अहो पण कोणाच्या ते माहितेये काय? तर ती चक्क मुंबईच्याच प्रेमात पडली आहे. मायानगरी मुंबईत जो पाऊल टाकेल तो या नगरीच्या स्वप्ननगरात रंगून जाईल, हे जगजाहीर आहे. असंच काहीसं सनीच्या बाबतीतही घडलंय. कॅनडीयन पॉर्न स्टार सनी लिओन हिनं बिग बॉस या रिअलिटी शोच्या माध्यमातून मुंबईत पाऊल टाकलं आणि आता तर ती मुंबईची रहिवासी झालीय.

तिचं स्वप्न आता पूर्ण झालंय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करता करता सनीसुद्धा ‘जिस्म-२’ हा बॉलिवूडमधला तिचा पहिला चित्रपट... या चित्रपटानंतर सनी मायदेशी परतली. पण, मुंबईची ओढ काही केल्या कमी होईना. मग काय, सनीनं इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि तो सत्यातही उतरवला. सनीनं नुकतंच मुंबईत एक नवीन घर घेतलंय. आपल्या नवीन घराविषयी सनीनं ट्विटरवर म्हटलंय, ‘आजचा माझा दिवसं खूप छान आहे.

मला असं वाटतय की मी राहण्यासाठी घेतलेली जागा अत्यंत सुंदर आहे, ज्याची मी कधी अपेक्षाही केली नव्हती. मनमोहक असा तीन बेडरूमचा खूप मोठा फ्लॅट... आणि फ्लॅटच्या समोरच सुंदर वातावरण असलेला समुद्रकिनारा... या सगळ्या गोष्टींमुळे मी सध्या अतिशय उत्साहित आहे’ ‘जर मला कुणी एक वर्षाआधी विचारलं असतं की मुंबईत माझं घरकुल तयार होणार आहे तर कदाचित मी त्यावर विश्वास ठेवला नसता, पण आज जेव्हा मी इथे राहतेय तर मला देखील असं वाटतंय की मी स्वतःच्या घरीच आलीय. मला असं वाटतयं की माझं स्वप्न पूर्ण झालंय पण ही तरी खरी सुरूवात आहे’ असं म्हणत सनीनं आपलं स्वप्न सत्यात उतरल्याचं म्हटलंय.

First Published: Thursday, October 18, 2012, 16:03


comments powered by Disqus