`स्प्लिट्सविला`मध्ये दिसणार सनीचा बोल्ड अंदाज SUNNY LEONE NOW IN SPLITS VILLA

`स्प्लिट्सविला`मध्ये दिसणार सनीचा बोल्ड अंदाज

`स्प्लिट्सविला`मध्ये दिसणार सनीचा बोल्ड अंदाज
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`एम टीव्ही स्प्लिट्सविला` यावेळी टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडण्याची तयारी करत आहे. कारण यावेळी स्प्लिट्सविलामध्ये बॉलिवूडमधील सगळ्यात मादक स्टार सनी लिऑन एन्ट्री करणार आहे. या कारणाने स्प्लिट्सविलाचा शो यावेळी सुपर हिट होण्याची शक्यता जास्त आहे.

कॅनेडीयन पॉर्न स्टार सनी लिऑन ही खरंतर भारतीय वंशाची आहे. या बिग बॉस या शोनंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करणं सुरू केलं. बॉलिवूडमध्ये एका रिएलिटी शोने एन्ट्री मिळाल्यानंतर आता पुन्हा स्प्लिटसविला या रिएलिटी शोद्वारे आपल्या हॉट अदांनी प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी सनी सज्ज झाली आहे.

स्प्लिट्सविला बाबत सनी म्हणाली,`एम टीव्ही हा एक प्रतिष्ठीत ब्रँड आहे. मी जेव्हा भारतात राहायला आली तेव्हा मी स्प्लिट्सविला पाहिलं होत. स्प्लिट्सविलाचा शो मला खूपच आवडला होता. आता तर मला स्प्लिट्सविलाच्या शोमध्ये काम करायला मिळणार असल्याने मी खूपच आनंदी आहे. मी या शोसाठी खूपच आतूर आहे. मला माहीत आहे की, माझ्यासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी हा शो म्हणजे एक उत्तम मेजवानी ठरणार आहे.

या शोच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री शर्लिन चोप्राने काम केलं होत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 14:28


comments powered by Disqus