‘बेबी के’ची उत्साही आई - Marathi News 24taas.com

‘बेबी के’ची उत्साही आई

www.24taas.com, मुंबई
 
सोमवारी सकाळी शिल्पा शेट्टी आत्तापर्यंत कधीच पाहायला मिळाली नाही, एव्हढी खुशीत असेन. आपल्या कुशीत एक छोटुकला पाहून तिनं आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांनी आपला आनंद इतरांशीही शेअर केला. एका वेगळ्याच आनंदात त्यांनी ट्विटरच्या साहाय्यानं सगळ्या जगाशी आपली एक्साईटमेंट जाहीर केली. याच आनंदात शिल्पानं आपल्या बाळाचं नामकरणंही करून टाकलं... ‘बेबी के’
 
नुकतंच ऐश्वर्या राय-बच्चन हिनंही एका मुलीला जन्म दिला. पण, बच्चन कुटुंबियांनी ही गोष्ट थोडी गुपितच ठेवली. त्यांच्या सगळ्या चाहत्यांचा नाही म्हटलं तरी थोडा हिरमोड झालाच. शेवटी आपल्या उत्साही मीडियानंच या बाळाचं ‘बेबी बी’ असं नामकरण केलं. (‘बेबी बी’ किंवा ‘बेटी बी’चं ला आता ‘आराध्या बच्चन’ असं नाव मिळालंय.) पण, कुंद्रा दांपत्यानं आपली गोड बातमी लगेचच सर्वांना कळवली. बाळ आणि आई दोघांची तब्येत चांगली असल्याचंही ते सांगायला विसरले नाहीत. अजूनही शिल्पा खारमधल्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. आणि तिथूनही ती ट्विटरवर आपला आनंद, आपली एक्साइटमेंट व्यक्त करतेय.
 
शिल्पासाठी हा अत्यानंदाचा क्षण आहे. ती म्हणते, ‘मी आई झालेय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही आम्हाल आणि ‘बेबी के’ला दिलेल्या सर्व शुभेच्छा आणि प्रेमासाठी मी मनापासून तुमची आभारी आहे.’ शिल्पा लवकरच तिच्या सगळ्या चाहत्यांशी बाळाचं खरं नावही शेअर करेल, याबद्दल शंकाच नाही.

First Published: Wednesday, May 23, 2012, 11:45


comments powered by Disqus