‘झलक दिखला जा’ची एक झलक... - Marathi News 24taas.com

‘झलक दिखला जा’ची एक झलक...

 www.24taas.com 
 
स्मॉल स्क्रीनचा लाडका शो झलक दिखला जा लवकरच दाखल होतोय आपल्या पाचव्या सिझनसह. माधुरी दीक्षितच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाचा हासुद्धा सिझन गाजणार असंच दिसतंय. शिवाय माधुरीच्या साथीला यावेळी रेमोसह दिग्दर्शक करण जोहरही जज म्हणून आपल्याला दिसणार आहे.
 
नुकताच ‘झलक दिखला जा – सीझन ५’च्या लॉन्चिंग सोहळ्यासाठी माधुरी दीक्षित, रेमो आणि करण जोहर हे तिघेही एकाच स्टेजवर पाहायला मिळाले. यावेळी स्पर्धकांमध्ये वर्णी लागलीय गुरमीत चौधरी, सनथ जयसूर्या, भारती सिंग, जिया मेनेक, प्रत्युषा बॅनर्जी, रवी किशन, दर्शिल सफारी, जयंती भाटीया, इशा श्रवाणी, शिबानी दांडेकर, तलत अजिझ आणि अर्चना विजया या १२ स्पर्धकांची. हे सगळेच स्पर्धक त्यांचे एक से एक परफॉर्मन्स देण्यास सज्ज आहेत. करण जोहर, माधुरी दीक्षित आणि रेमोही या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनसाठी उत्सुक आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत झलक दिखलाजाचा पाचवा सिझन चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत.
 
.
 

First Published: Friday, June 8, 2012, 21:04


comments powered by Disqus