पूनम पांडे म्हणते, पुरूषांची नजर असते 'तिकडे' - Marathi News 24taas.com

पूनम पांडे म्हणते, पुरूषांची नजर असते 'तिकडे'

www.24taas.com
 
नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी काहीही करण्याच्या तयारीत असणाऱ्या पुनम पांडे हिने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिने असं वक्तव्य केलं आहे ज्याने सारेच अवाक् झाले आहेत. पूनमने नुकतचं काही दिवसापूर्वी स्वत:चं कपडे उतरवून फोटोशूट केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा पुनमने खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
 
नुकतचं पुनमने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, 'एक गोष्ट अशी की, पुरूष जेव्हा एखाद्या स्त्रीला पाहतो तेव्हा त्याची नजर ही तिच्या डोळ्यांकडे जाते. पण त्यानंतर त्याचे डोळे हे काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करीत असतात... आणि त्यांची नजर जाते ती स्त्रीच्या वक्षस्थळावर..' अशाप्रकारचं उत्तेजक असं वक्तव पूनम पांडेने केलं आहे.
 
काही दिवसापूर्वीच शाहरूख  खानच्या टीमसाठी पूनम पांडेने कपडे उतरवले होते. ती एवढ्यावरच  न थांबता तिने नग्न छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केलं होतं. पूनम पांडेचे ट्विटरवर हे नग्नावस्थेतील छायाचित्र प्रसिद्ध होताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायलाच सुरुवात झाला होता. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर कपडे उतरविण्याचा संकल्प केला होता. तो पूनम पांडेला पाळता आला नसला तरी तिने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानंतर न्यूड होऊन हा विजय साजरा केला होता.
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 14, 2012, 16:01


comments powered by Disqus