Last Updated: Thursday, June 14, 2012, 16:20
www.24taas.com, इस्तंबूल 
आपल्या जादूई आवाजाने साऱ्यानांच वेड लावणारी, आणि सगळ्यांना आकर्षित करणारी पॉप गायिका मॅडोना पुन्हा एकदा विवादात आली आहे. इस्तंबूल येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत समारंभात एक विचत्र गोष्ट केली.
संगीत कार्यक्रमात मॅडोनाने आपल्या शरीराचा एक भाग पूर्णपणे निवस्त्र केला. आणि त्यावेळेस जेव्हा मॅडोनाने आपल्या शरीरावरील कपडे उतरविले तेव्हा त्या कार्यक्रमाला जवळजवळ ५५ हजार लोक उपस्थित होते. ५३ वर्षीय पॉप गायिका आपल्या लोकप्रिय गाणं 'ह्यूमन नेचर' गात होती. त्यावेळेस मॅडोनाने आपल्या शरीरावरील कपडे उतरविण्यास सुरवात केली.
एका वृत्तपत्रानुसार गाण ं गात असताना मॅडोना ही गात असताना अगदी जोशात आली होती. आणि एकवेळ अशी आली की मॅडोनाने आपली कंबर आणि त्याखालील डाव्या भागावरील पूर्णपणे उघड केला. पण ही अशी पहिलीच वेळ नाही. मॅडोनाने याआधीही तिच्या लाईव्ह कार्यक्रमात असे कारनामे केले होते.
First Published: Thursday, June 14, 2012, 16:20