सैफ-करीनाचे लग्न २०१२ला - Marathi News 24taas.com

सैफ-करीनाचे लग्न २०१२ला

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
‘एजेंट विनोद’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हिंदी चित्रपटसृटीतील स्टार जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता अधिक आहे.  २०१२ या वर्षात सैफ-करीना लग्न करतील, अशी माहिती करीनाची बहीण करिश्मा हिने मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितले.
 
सैफ-करीना यांच्या लग्नाची तारीख अजून काढलेली नाही. मात्र, ‘एजेंट विनोद’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर २०१२ मध्ये लग्न होईल, असं आम्हा सर्वांना वाटत आहे. हेच सर्व जग जाणत आहे, जसे आम्हाला समजेल, ते आपल्याला सांगितले जाईल, असे करिश्मा हिने सांगितले.
 
मी आणि माझा जीवनसाथी सैफ लग्नाची घोषणा करण्यासाठी ‘एजेंट विनोद’ या सिनेमाच्या प्रदर्शानाकडे लक्ष लागले आहे, काही दिवसांपूर्वी करीना हिने सांगितले होते. आता तिची बहिण करिश्मा हिने पुढील वर्षी लग्न होईल, असे म्हटल्यांने लग्नाच्या वृत्ताला अधिक दुजोरा मिळाला आहे.
 
श्रीराम राघवन निर्देशित आणि सैफ अली खान निर्मित हा सिनेमा २०११ मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर करीना-सैफच्या लग्नाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. यातील काही वृत्तांना सैफची बहिण सोहा अली खान हिने दुजोरा दिला आहे. सैफचा स्वनिर्मित हा सिनेमा आहे.
 
‘एजेंट विनोद’ हा सिनेमा फेब्रुवारी मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे मार्च महिन्यात सैफ-करीनाचं लग्न होईल, असं सोहा हिने स्पष्ट केलं आहे.

First Published: Thursday, December 8, 2011, 10:44


comments powered by Disqus