बालन फिवर आता बॉलिवूडमध्ये - Marathi News 24taas.com

बालन फिवर आता बॉलिवूडमध्ये

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
डर्टी पिक्चरमुळे विद्या बालन सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिची अदाकारी पाहून सध्या बॉलिवूडमध्ये विद्या म्हणजे सिनेमाची वन वुमन आर्मीच  आहे, असं बोललं जातंय. म्हणूनच खान फॅक्टर सारखाच बालन फॅक्टर आता बॉलिवूडमध्ये रुजायला लागणार असंच दिसतंय.
 
 
बॉलिवूड मध्ये सिनेमा सुपर हिट होण्यासाठी खान फॅक्टर खूपच महत्यावाचा मानला जातो.. मात्र हे समीकरण चुरकीच ठरवलंय ते विद्या बालननं. डर्टी पिक्चरनं कमाल केली. सिनेमा रिलीज झाल्यानंतर काहीच दिवसात तो तिकीट खिडकीवर  सुपर हिट झालाय. फक्त व्यासायिक दृष्टायच नाही तर विद्या बालनच्या अभिनयालाही प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनी पसंतीची पावती दिलीय.
 
डर्टी पिक्टरचं प्रचंड प्रमोशन केलेल्या विद्या बालननं एकटीनं स्वत:च्या खांद्यावर संपूर्ण सिनेमाची धुरा सांभाळली. सिल्क स्मिताच्या व्यक्तिरेखेत असलेल्या विद्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपण एकट्या बॉलिवूडच्या सगळ्या हिरोंना आणि विशेषत: खान मंडळींना पुरुन उरु असंच दाखवून दिलंय. आणि म्हणूनंच तिला विदा बालन खान अशी उपमा डर्टी पिक्चर्चची निर्माती एकता कपूरनं दिलीय.
 
तर डर्टी पिक्चमुळे प्रचंड आत्मविश्वास कमवलेल्या विद्यानंही आपण विद्या बालन खान असं नाव लावण्या पेक्षा बॉलिवूडच्या खान मंडळींनीच आपलं नाव लावायला हरकत नाही म्हणजे त्यांचा सिनेमा हिट होईल असा मैत्रीपूर्ण सल्ला या खान मंडळींना दिलाय.
 

 
 

First Published: Friday, December 9, 2011, 11:58


comments powered by Disqus