चौथे विश्व साहित्य संमेलन टोराँटोत - Marathi News 24taas.com

चौथे विश्व साहित्य संमेलन टोराँटोत

www.24taas.com, टोराँटो 
 
चौथे विश्व साहित्य संमेलन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी टोराँटो येथे  होणार आहे. आधी ठरविण्यात आलेल्या तारखेमुळे काहींनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे संमेलन आयोजनात समन्वय नसल्याचा आरोप झाला होता.
 
पुणे- निधी संकलना अभावी  हे संमेलन लांबणीवर पडलेले होते. टोराँटो येथील मराठी महामंडळाने यंदाच्या विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.  संमेलन  आयोजित करताना योग्य समन्वय नसल्याने रद्द करून काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय मराठी महामंडळाने घेतला होता.
 
नुकतेच मराठी महामंडळाने आपल्या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट, एक आणि दोन सप्टेंबर अशी विश्व साहित्य संमेलनाची तारीख जाहीर केली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली आहे. टोराँटो येथील मिसिसागा मधील लिव्हिंग आर्टस सेंटर येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर भूषवणार आहेत.

First Published: Tuesday, June 26, 2012, 10:07


comments powered by Disqus