Last Updated: Tuesday, July 3, 2012, 15:25
www.24taas.com, लंडन 
सुप्रसिद्ध गायिका निकी मिनाजने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. निकीने असं वक्तव्य केलं आहे की, ज्याने सारेच चक्रावले आहे. 'महिलांचे स्तन हे फारच आकर्षक असतात. त्यात खूप वेगळी ताकद असते. आणि त्यामुळे मी त्यावरच ऑटोग्राफ करते. आणि ऑटोग्राफ असणारे वक्षस्थळ जास्त आकर्षक दिसतात'.
'माझ्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या वक्षस्थळावर मी माझी ऑटोग्राफ देणं सुरू केलं आहे. आणि माझ्या महिला चाहत्यांना देखील असं करणं फार आवडतं'. असं निकीने म्हटलं आहे. निकिने एका प्रकट मुलाखतीत, ही गोष्ट सांगितली आहे. 'माझं म्हणणं आहे की, स्तन हे आकर्षक असतात. आणि त्यामुळेच मी त्याच्यावर ऑटोग्राफ देणं पसंत करते, निकने म्हटलं आहे की, मी गेल्या वर्षीपासून वक्षस्थळावर ऑटोग्राफ देते आहे.
मी कुठेही जाते तेव्हा माझे प्रशसंक माझ्या ऑटोग्राफसाठी आसुसले असतात. आणि त्यामुळेच मी त्यांना नेहमी लक्षात राहिल अशा जागी माझी ऑटोग्राफ देते'. महिलांच्या वक्षस्थळावर जशी मी माझी ऑटोग्राफ देते त्याच प्रमाणे मी पुरूषांच्या छातीवरच माझी ऑटोग्राफ देते. आणि त्यात पुरूषांनाही मजा वाटते. ते त्या गोष्टीचा आनंद घेतात.
First Published: Tuesday, July 3, 2012, 15:25