माधुरीने घातली उद्धव ठाकरेंना गळ - Marathi News 24taas.com

माधुरीने घातली उद्धव ठाकरेंना गळ

www.24taas.com, मुंबई
 
धकधक गर्ल माधुरी दीक्षितला मुंबईत डान्स अकादमी सुरू करायची आहे. यासाठी वांद्रे ते दहिसर दरम्यान भूखंड मिळविण्यासाठी माधुरी प्रयत्नशील आहे. पालिकेचा भूखंड मिळावा, यासाठी माधुरीने थेट शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनाच गळ घातली आहे.
 
माधुरीने उद्धव ठाकरेंना एका पत्राद्वारे दोन हजार चौरस फुट जागेची मागणी केलीये. आता अमेरिकेहून मुंबापुरीत कमबॅक करणा-या धकधक गर्लला नाराज तरी कसं करणार...म्हणूनच की काय, माधुरीच्या डान्स अकादमीच्या जागेसाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी आता महापालिकेतील शिवसेना पदाधिका-यांना फर्मान सोडलं आहे. त्यामुळे आता माधुरीला भूखंड देण्याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या येत्या बैठकीत मांडण्यात आल्यास आश्यर्य वाटायला नको.
 
दरम्यान, माधुरीने या डान्स अकादमीमध्ये पालिकेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्याची अट कबुल करावी, तरच तिला भूखंड देण्यात य़ावा, अशी अपेक्षा स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलीये.

First Published: Wednesday, July 11, 2012, 22:26


comments powered by Disqus