Last Updated: Saturday, July 14, 2012, 16:44
www.24taas.com, नवी दिल्ली 
ही बातमी जुनी झाली होती की, शर्लिन चोप्रा अडल्ट मासिकावर प्लेबॉय सोबत कव्हर पेजवर दिसणार. मात्र आता ट्विटरवर शर्लिनने आपला एक असा फोटो अपलोड आहे ज्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
हा फोटो त्या मासिकाच्या शुटींग दरम्यान काढण्यात आला आहे. शर्लिनला तिच्या अशा वागण्याचं काहीही वाटत नाही. उलट तिला या गोष्टीचा गर्वच वाटतो आहे. ती मासिकाच्या कव्हर पेजवर प्लेबॉयसोबत दिसणार आहे याचा तिला खूप आनंद होत आहे. या फोटोमध्ये ती पूर्णपणे निवस्त्र झालेली आहे. आणि तिचा एक मुलगाही सोबत आहे.
शर्लिनने प्लेबॉय मासिकाच्या सर्वेसर्वा ह्यू हेफनरसोबतही काही फोटो काढले आहेत. आणि आता ती त्या प्लेबॉय सोबत एका बंगल्यात राहते आहे. शर्लिन ही पहिली भारतीय महिला आहे जी प्लेबॉय मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. प्लेबॉय मासिक हे अमेरिकेत छापलं जाणारं अ़डल्ट मासिक आहे. आणि या मासिकांचा खप लाखोंच्या संख्येने आहे.
First Published: Saturday, July 14, 2012, 16:44