शेखर सुमनला हवी आहे सनी लिऑन... - Marathi News 24taas.com

शेखर सुमनला हवी आहे सनी लिऑन...

www.24taas.com
 
 
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आणि अभिनेता शेखर सुमन ह्याला सुद्धा पॉर्न स्टार सनी लिऑनची भुरळ पडली आहे. शेखर सुमन याला सुद्धा सनी लिऑनसोबत सिनेमा बनवायचा आहे. शेखप आपल्या आगामी 'हार्टलेस' या सिनेमात दिग्दर्शन करणार आहे. आणि या सिनेमात तो स्वत:चा मुलगा अध्ययन याला मुख्य भुमिका देणार आहे.
 
हार्टलेस या सिनेमापासून शेखर सुमन आपल्या दिग्दर्शनाच्या नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आणि शेखर सुमनला आशा आहे की, या सिनेमात त्यांना सनी लिऑन दिसेल. शेखर सुमनच्या मते, दिग्दर्शन अत्यंत आव्हानात्मक आहे. यात अनेक अंगाने विचार करावा लागतो. त्यामुळे आता ही नवीन इनिंग सुरू करताना खरा कस लागणार आहे.
 
शेखरने सांगितले की, हार्टलेस मध्ये अध्ययन आणि मी एकत्र काम करणार आहोत. आणि आमच्या सोबत सनी लिऑन देखील असेल. मी लवकरच तिला भेटणार आहे.
 
 
 

First Published: Saturday, July 14, 2012, 17:29


comments powered by Disqus