Last Updated: Tuesday, July 17, 2012, 13:18
www.24taas.com, मुंबई 
मॉडेल गेहना वसिष्ठ हिने मॉडेलिंगचा फोटोशूटसाठी भारतीय ध्वज आपल्या कमरेखाली गुंडाळला होता. त्यामुळे तिला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तिला अनेकजणांनी मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण जास्तच चिघळलं होतं.
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी मॉडेल गेहना वसिष्ठ हिच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र व्ही. ब्रह्मे यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेहना वसिष्ठ हिने राष्ट्रध्वजाचा अवमान करून अश्लील छायाचित्रे एका वेबसाइटवरून प्रसिद्ध केल्याचा प्रकार ब्रह्मे यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे ब्रह्मे यांनी त्वरित डेक्कन पोलीस ठाण्यात संपर्क साधला. राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
First Published: Tuesday, July 17, 2012, 13:18