सुपरस्टारची सफर...एक नजर - Marathi News 24taas.com

सुपरस्टारची सफर...एक नजर

www.24taas.com, मुंबई
 
२९ डिसेंबर १९४२ ला राजेश खन्नांचा अमृतसरला जन्म. जतीन खन्ना नाव. २४  व्या वर्षी म्हणजेच १९६६ ला आखिरी खत या चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात...   त्यानंतर राज, बहारों के सपने, औरत के रुप  असे सिनेमे केले पण १९६९ मध्ये आलेल्या आराधनाने खरे यश मिळवून दिले.  त्यानंतर एकामागोमाग १४ सुपरहिट फिल्मस देण्याचा मान राजेश खन्नालाच जातो. त्यामुळंच ते हिंदे सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.
 
 
१)  २९  डिसेंबर १९४२  ला जन्मलेले राजेश खन्ना शाळा कॉलेजच्या काळापासूनच अभिनय़ करत आलेत. त्यांना त्यांच्याच एका नातेवाईकानं दत्तक घेतलं होतं आणि पालनपोषण केलं होतं.
 
२)  राजेश खन्नानं चित्रपटांतून कामं मिळावित यासाठी अनेक निर्मात्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले. स्ट्रगलर असूनही
ते महागड्या कारमधून निर्मात्यांकडे जात. अशा कार्स तेव्हाच्या टॉप अभिनेत्यांकडेही नसायच्या.
 
३) एक स्पर्धा जिंकताच त्यांचा संघर्ष संपला आणि त्यांना राज या सिनेमासाठी साईन करण्यात आलं... जी पी सिप्पी यांच्या या सिनेमात तेव्हाची बबीतासारखी मोठी स्टार होती.
 
३)  मात्र राजेश खन्नाचा पहिला प्रदर्शित चित्रपट ठरला ‘आखिरी खत’ हा सिनेमा १९६७ मध्ये रिलीज झाला.
 
४)  १९६९ मध्ये रिलीज झालेल्या आराधना आणि दो रास्ते च्या यशानंतर राजेश खन्नानं मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना थेट सुपरस्टार ही बिरुदावली प्रदान करण्यात आली आणि लोकप्रियतेच्या शिखरावर बसवण्यात आलं.
 
५) सुपरस्टारपदाच्या सिंहासनवर राजेश खन्ना फार काळ राहिले नाहीत मात्र त्यांना जितकी लोकप्रियता नंतर कोणालाही मिळाली नाही.
 
६)  तरुणींमध्ये तर राजेश खन्ना विशेष लोकप्रिय... असंही म्हटलं जातं की त्यांना मुलींनी रक्तानं पत्र लिहिली आहेत. त्यांच्या फोटोशीच लग्नही केलं. हातावर पायांवर राजेश खन्नाचं नावही गोंदवून घेतलं.त्यांचा फोटो उशाशी घेऊन तरुणी झोपायच्या.
 
७) असंही म्हणतात की एखाद्या स्टुडिओ किंवा निर्मात्याच्या ऑफिसबाहेर राजेश खन्नाची सफेद कार दिसली तर मुली त्या कारलाच किस करायच्या त्यांच्या लिपस्टिकच्या रंगानं कारचा रंगच गुलाबी  व्हायचा.
 
८) निर्माता दिग्दर्शक राजेश खन्नाच्या घराबाहेर रांग लावून उभे राहात आणि मागेल त्या मानधनावर त्यांना साईन करत.
 
९)  एक आढवण अशी सांगितली जाते की पाईल्सच्या ऑपरेशनसाठी राजेश खन्नाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं होतं तेव्हा निर्मात्यांनी त्यांच्या रुमजवळी दुस-या रुम्स बुक केल्या कारण संधी मिळताच राजेशला आपल्या सिनेमाची कथा ऐकवता येईल.
 
१० )  राजेश खन्ना विशेष लोकप्रिय ठरले ते रोमॅण्टिक हिरो म्हणून... त्यांची डोळे मिचकावण्याची, मान तिरकी करून बोलण्याची लकब लोकांना विशेष भावली.
 
११)  राजेश खन्नाने वापरेलेले कुर्ते खास प्रसिद्ध होते. लोकांनीही तसेच कुर्ते वापरायला सुरुवातही केली होती.
 
१२) आराधना, सच्चा झूठा, कटी पतंग, हाथी मेरे साथी, मेहबूब की मेहंदी, आनंद, आन मिलो सजना, आपकी कसम सारख्या चित्रपटांनी उत्पन्नाचे नवे रेकॉर्डस प्रस्थापित केले.
 
१३ ) आराधना मधील मेरे सपनों की रानी कब आएगी तू... हे गाणं त्यांच्या करिअरचं सर्वाधिक हीट गाणं ठरलं.
 
१४)  तर आनंद हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो. यात त्यांनी कॅन्सरग्रस्त युवकाची भूमिका साकारली होती.
 
१५)  राजेश खन्नाच्या यशामागे संगीतकार आर डी बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचं मोलाचं योगदान आहे....या त्रयींची अनेक गाणी हीट झाली आहेत... किशोरनं ९१ चित्रपटांमधून राजेशला आवाज दिलाय तर आर डी बर्मन यांनी त्यांच्या ४० सिनेमांना संगीत दिलंय.
 
१६) आपल्या सिनेमांच्या संगीताबाबत ते नेहमी सतर्क राहायचे. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी ते नेहमी स्टुडिओत हजर असायचे आणि आपल्या सुचना संगीत दिग्दर्शकांकडे नोंदवायचे.
 
१७) मुमताज आणि शर्मिला टागोर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. मुमताज सह तर त्यांनी ८  हीट सिनेमे दिले.
 
१८) मुमताजनं लग्न करून चित्रपटसृष्टीतून घेतलेला संन्यास त्यांना फारसा रुचला नाही.
 
१९)  शर्मिला आणि मुमताजच्या म्हणण्यानुसार तरुणींमनध्ये राजेश खन्नासाठी असलेली क्रेझ नंतर कुणाच्याही बाबतीत नंतर दिसली नाही.
 
२०)  आशा पारेख आणि वहिदा रेहमान सारख्या सिनिअर एक्ट्रेसबरोबरही त्यांनी काम केलंय... खामोशी मध्ये वहिदाच्या सांगण्यावरूनच राजेशला सामील करण्यात आलं.
 
२१)  गुरुदत्त, मीना कुमारी आणि गीता बाली हे राजाश खन्नाचे आदर्श.
 
२२) जंजीर आणि शोले सारख्या चित्रपटांमधून अमिताभ बच्चनच्या उदयानंतर राजेश खन्नांची क्रेझ कमी होऊ लागली. लोकांना एक्शन फिल्मस आवडू लागल्या आणि 1975 नंतरच्या राजेश खन्नाच्या रौमॅण्टिक फिल्मस चालेनाशा झाल्या.
 
२३)  काही जण राजेश खन्नाचा अहंकार आणि खुशमस्करी लोकांच्या गोतावळ्यात रमणं ही त्याच्या उतरत्या काळाची प्रमुख कारणं मानतात. यानंतर राजेश खन्नानं अनेक सिनेमे केले मात्र यशाचा तो आलेख पुन्हा उभारता आला नाही.
 
२४) त्यावेळी राजेशनं अनेक चित्रपट नाकारले आणि हेच चित्रपट अमिताभनं स्वीकारले. यातील काही चित्रपटांमुळे अमिताभ सुपरस्टार होत गेला आणि राजेश खन्नाचं पतन होत गेलं.
 
२५)  राजेशच्या स्वभावामुळे मनमोहन देसाई, शक्ति सांमत, ऋषिकेश मुखर्जी आणि यश चोपडानं अमिताभबरोबर फिल्मस केल्या.
 
२६) ) त्याकाळी अमिताभ आणि राजेश खन्ना प्रतिस्पर्धी मानले जात. दोघांनी आनंद आणि नमकहराम सारख्या दोन फिल्मस केल्या या दोन्ही सिनेमांमध्ये राजेशच्या व्यक्तीरेखा अमिताभच्या तुलनेत सशक्त होत्या.
 
२७) ही स्पर्धा एका कथेवरून आणखी तीव्र झाली. राजेशचा आज का एमएलए रामअवतार आणि अमिताभचा इंकलाब हे दोन्ही सिनेमे एकाच कथेवर बेतले होते. दोन्ही फिल्म्स फ्लॉप ठरल्या.
 
२८)  रोमॅण्टिक हिरोची भूमिका साकारणारे राजेश खन्ना रिअल लाईफ मध्यही रोमॅण्टिक होते. अंजू महेन्द्रू सह त्यांचं अफेअर बरंच गाजलं...तितकाच त्यांचा ब्रेकअपही गाजलं. या मागचं कारण दोघांनीही सांगितलं नाही काही काळानंतर अंजूनं क्रिकेटर गॅरी सोबर्ससह एंगेजमेंट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
 
२९)  राजेश खन्नानं अचानकडिम्पल कपाडीयासह लग्न केलं.
 
३०) समुद्रकिनारी फिरताना अचानक राजेश खन्नांनी डिम्पलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि डिम्पलनंही त्याला होकार दिला. डिम्पल या लग्नावेळी वयानं राजेशपेक्षा बरीच लहान होती.
 
३१) राजेश डिम्पलच्या लग्नाची एक क्लिप देशभरातल्या थिएटर्समध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी दाखवली जायची.
 
३२) या दाम्पत्याला ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली झाल्या. डिम्पल राजेशचं नातंही फार काळ टिकलं नाही.
 
३३)  मात्र वेगळं झाल्यानंतरही संकटसमयी डिम्पलनंच राजेशला साथ दिली. अगदी आताही आजारपणात डिम्पलच त्यांच्या बरोबर आहे. अगदी निवडणूक काळातही तिनं राजेशचा प्रचार केला होता.
 
३४) म्हेवणी सिंपलसह अनुरोध या चित्रपटातून काम केलंय.
 
३५) राजीव गांधीच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस आय कडून त्यांनी काही निवडणुका लढवल्या यात कधी हार तर कधी यश चाखलं. अगदी लालकृष्ण अडवाणींना कडवी झुंज दिली तर शत्रुघ्न सिन्हाला पराभूत केलं. आता त्यांना राजकारणातही रस उरला नाही.
 
३६)  राजेश खन्नाच्या आयुष्यात टीना मुनीमही आली. आपण दोघं एकच टुथब्रश वापरत असल्याचं राजेश खन्नानं त्यावेळी सांगितलं होतं.
 
३७)  जितेंद्र आणि राजेश खन्ना एकाच शाळेत एकत्र शिकले आहेत.
 
३८)  राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल यांची जन्मतारीख एकच २९ डिसेंबर.
 
३९) काही वर्षांपूर्वी जय शिव शंकर या सिनेमात काम मागण्यासाठी राजेश खन्ना यांच्या कार्यालयात अक्षय कुमार गेला होता मात्र बराच वेळ होऊनही राजेश खन्नांनी त्याला भेट दिली नव्हती. आज हाच अक्षय कुमार त्यांचा जावई आहे. याची तेव्हा कुणाला कल्पनाही नसेल.
 
४०) अक्षय हा लहानपणापासून राजेश खन्नाचा फॅन होता. आराधना, अमरप्रेम आणि कटी पतंग हे त्याचे आवडते सिनेमे.
 
४१)  असं म्हणतात की राजेश खन्नानं आपला पैसा एका लॉटरी कंपनीत गुंतवला असून त्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं.
 
४२) राजेश खन्नांच्या मते ते  त्यांच्या आयुष्यापासून समाधानी आहेत आणि पुन्हा संधी मिळाल्यास त्यांना पुन्हा राजेश खन्नाच व्हायला आवडेल आणि पुन्हा त्याच चुका करायलाही आवडेल.
 
४३) स्वत:च्या बॅनरखाली त्यांनी जय शिव शंकर नावाची फिल्म सुरु केली यात त्यांनी त्यांची पत्नी डिंपलला साईन केलं मात्र अर्धा पल्ला गाठल्यानंतर काम थांबलं आणि आजवर हा सिनेमा रिलीज झाला नाही.
 
४४) राजेश खन्नानं तीनदा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावलाय तर चौदावेळा त्यांचं नॉमिनेशन झालंय.
 
४५) शाहरुख खानच्या मते राजेश खन्नाला मिळालेल्या लोकप्रियतेला नंतर कुणीच गवसणी घालू शकलेलं नाही.

First Published: Wednesday, July 18, 2012, 14:36


comments powered by Disqus