अमिताभच्या बंगल्यात कोण घुसले? - Marathi News 24taas.com

अमिताभच्या बंगल्यात कोण घुसले?

www.24taas.com, मुंबई

बिग बी आणि बॉलिवू़ड का शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या `जलसा` या बंगल्यात एका अज्ञात  व्यक्तीने घुसखोरी केली. त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घुसखोरी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत खुद अमिताभनेच माहिती दिली आहे. बिग बीने आपल्या `एसआरबच्चनडॉटटम्बलर डॉट कॉम` वर याची माहिती दिली आहे. हा घुसखोर बंगल्यात शिरल्याने आम्ही खूप चिंतीत होतो. त्यामुळे काहीकाळ आम्हाला चिंतेने ग्रासले होते. मात्र, त्याला पोलिसांनी पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे.
 
या घुसखोरीमुले बंगल्याची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.  बिग बी म्हणतात, एक व्यक्ती सुरक्षितेकडे किती लक्ष देईल. जुहू येथे अमिताभ बच्चन यांचे दोन बंगले आहेत. जलसा आणि प्रतिक्षा. जलसामध्ये अमिताभ, जया , अभिषेक , ऐश्वर्या आणि नात आराध्या राहत आहे. तर प्रतिक्षामध्ये अमिताभचा भाऊ अजिताभ राहत आहेत.

First Published: Sunday, July 22, 2012, 14:28


comments powered by Disqus