निर्वस्त्र होणं इतकं सोपं नसतं - शर्लिन चोप्रा - Marathi News 24taas.com

निर्वस्त्र होणं इतकं सोपं नसतं - शर्लिन चोप्रा

www.24taas.com, मुंबई
 
प्लेबॉय मॅगझीनसाठी नग्न होऊन पोझ दिल्यानंतर मॉडेल आणि बॉलीवूडची हॉट अभिनेत्री शर्लिन चोप्राने आता हे मान्य केलं आहे की, कपड्याविना नग्न होऊन फोटो काढणं तितकं सोपं नसतं. शर्लिनने तिच्य़ा नुकत्याच काही निवस्त्र अशा अवस्थेत फोटो काढले होते. आणि त्यानंतर तिने असंही म्हटलं होतं की, तिला भारतरत्न मिळाला पाहिजे.
 
शर्लिन चोप्रा ही प्लेबॉय मॅगझीनसाठी नग्न होऊन फोटो काढणारी पहिली भारतीय महिला आहे. नुकतीच ती अमेरिकेत जाऊन आली, आणि तेथील हग हफनरच्या प्लेबॉय परिसरात हे फोटो काढले होते. आपल्या प्रकट मुलाखतीमध्य़े तिच्या या अनुभवावर चर्चा करताना शर्लिनने म्हटंले की, मी जगभरातील प्रतिष्ठीत आणि एक वेगळा दर्जा असलेल्य़ा अ़डल्ट मॅगझीनसाठी मी नग्न पोज देण्याची संधी अजिबात दव़डू इच्छित नव्हती.
 
मॅगझीनच्या या ऑफरबाबत तिला विचारले असता, शर्लिनने म्हंटले की, पहिले त्यांनी मॅगझीनच्या नग्न फोटोसाठी संपर्क केला, आणि  त्यांच्याक़डून तीन ते चार दिवसांनी लगेचच उत्तरही आलं. आणि या मॅगझीनला मी नग्न पोझ देणारी पहिली भारतीय महिला आहे, आणि माझा हा रिकॉर्ड कोणी हिरावून घेऊ शकत  नाही. माझी बहिण देखील माझ्या या कामापासून खूप खूश आहे. मी माझ्या आईला या कामाबाबत तसं काही सांगितलेलं नाही. मात्र मी विचार करते की, मी तिच्याजवळ गेल्यावर ती मला नक्कीच स्विकारेल. शर्लिनने सांगितलं की, हग हेफनर सोबत माझा अनुभव खूपच मस्त होता.. मी आणि त्याने केलेली मस्ती ही न विसरता येण्यासारखी आहे.
 
 

First Published: Thursday, July 26, 2012, 16:14


comments powered by Disqus