Last Updated: Friday, January 20, 2012, 18:19
www.24taas.com, मुंबई टेनिसपटू महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. लारा दत्ताने मुंबईतील हॉस्पीटलमध्ये कन्यारत्नाला जन्म दिला. 'इटस् अ गर्ल !!!!!, आय लव्ह यू लारा दत्ता,' असे महेश भूपतीने ट्विट केले आहे.
मेहश भूपती-लारा दत्ताचा गोव्यात १६ फेब्रुवारी २०११ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. लारा दत्ता 2000 मध्ये विश्वसुंदरी झाली. त्यानंतर तिने २००३ मध्ये अंदाज या चित्रपटात भूमिका केली होती. लारा दत्ताने कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर लारा आणि महेशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भूपतीची दक्षिण आफ्रिकेतील प्रशिक्षक श्यामल यांनी खास शुभेच्छा देताना सांगितले की, तिच्यासाठी पुन्हा एक ट्रॉफी जिंक.
अमेरिकेचा बॉब ब्रायन याने ट्विट केलंय, मित्रा, सुंदर. शुभेच्छा.
लाराची मैत्रीण आणि अभिनेत्री बिपाशा बासू हीने ट्विट करताना म्हटलं, वा, हॅविंग, कॉंग्रेटस.
अभिनेत्री नेहा धूपियाने ट्विट करताना म्हटलंय, आपल्या छोट्या राजकुमारीच्या आगमनाच्या सुंदर जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा.
First Published: Friday, January 20, 2012, 18:19