Last Updated: Sunday, March 25, 2012, 15:45
www.24taas.com, मुंबई 
संस्कृती कलादर्पणचा पुरस्कार 'झी २४ तास'च्या पत्रकार 'जंयती वाघधरे' यांना मिळाला आहे. नाटक, सिनेमा आणि वृत्तविषयक कार्यक्रमांसाठी हे पुरस्कार दिले जातात. वृत्तविषयकासाठीचा सर्वोत्कृष्ट मुलाखतकार म्हणून जयंती वाघधरे यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
संस्कृती कलादर्पण या पुरस्कार सोहळ्यात मराठी ताऱ्यांचीही उपस्थिती होती. संस्कृती कलादर्पण हा मानाचा असा पुरस्कार समजला जातो. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याने जयंती वाघधरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण त्याचसोबत त्यांनी केलेल्या दर्जेदार कामाची ही पोचपावतीच होती.
जयंती वाघधरे यांना वृत्तविषयकासाठी सर्वोत्कृष्ट मुलाखतकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. जयंती वाघधरे यांनी आजवर कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती झी २४ तास'साठी घेतल्या आहेत. आणि या मुलाखती उत्कृष्ट दर्जाच्या असल्यामुळे संस्कृती कलादर्पण तर्फे त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं.
First Published: Sunday, March 25, 2012, 15:45