वान्या मिश्रा मिस इंडिया वर्ल्ड - Marathi News 24taas.com

वान्या मिश्रा मिस इंडिया वर्ल्ड

www.24taas.com, मुंबई
 
चंदिगडमधील जालंधरची कन्या वान्या मिश्रा २०१२ची मिस इंडिया वर्ल्ड झाली. तिला अंधेरीतील भवन्स ग्राउंड येथे झालेल्या भव्य समारंभात मिस  इंडिया वर्ल्डचा मुकुट परिधान करण्यात आला. तर या स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्राचीने मिस इंडिया अर्थचा किताब पटकावला आहे.
 

 
पाच फूट आठ इंच असलेल्या वान्या मिश्राने सर्वोत्तम २० स्पर्धेकांमध्ये डाबर गुलाबरी मिस रोझ ग्लो येथून वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविला होता. या स्पर्धेत जयपूरची २० वर्षीय रुही सिंह सुद्धा होती. मात्र, वान्याने तिला मागे टाकत हा किताब जिंकला. तर  मिस इंडिया अर्थचा किताब पुण्याची २४ वर्षीय प्राची मिश्रा हिने पटकावला. तर चेन्नईची २३ वर्षीय सुंदरी रोशेल मारिया राव मिस इंडिया इंटरनॅशनलसाठी निवडली गेली. अंतिम फेरीसाठी २० जणींची निवड करण्यात आली होती. यातून या सुंदरींची निवड करण्यात आली आहे.
 
 
तिन्ही विजेत्या सुंदरीना कनिष्ठा धनखड़, हसलीन कौर आणि अंकिता शौरी या गतवर्षीय सुंदरींनी अनुक्रमे मुकुट परिधान केला. या स्पर्धेचे आयोजन प्रस्तोता आयुष्मान खुराना आणि मनिष पॉल यांनी केले होते. १९ वर्षीय वान्या मिश्रा हिची मिस वर्ल्ड २०१२साठी भारताचे प्रतिनीधी म्हणून निवड झाली आहे.
 
फोटो पाहण्यासाठी क्लिक करा
मिस इंडिया वर्ल्ड वान्या मिश्रा

First Published: Saturday, March 31, 2012, 11:36


comments powered by Disqus