Last Updated: Friday, December 16, 2011, 13:03
झी २४ तास वेब टीम, मुंबई अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या मुलीचे नाव सुचविण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन ट्विटरवरून ट्विट करताना केलं आहे.
अभिषेकने आज ट्विट करताना चाहत्यांचे आभारही मानले आहेत. मुलीचे नाव 'ए' अक्षरापासून सुचविण्याचे चाहत्यांना आवाहन केलं आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नावाचे अक्षर ए अक्षरापासून सुरु होत असल्याने त्याने आपल्या मुलीचे नावही 'ए' अक्षरापासून ठेवणार असल्याची चर्चा आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन हिने १६ ऑक्टोबरला मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर सतत बच्चन कुटुंबियांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यामुळे अभिषेकने ट्विटरवरूनच त्यांचे आभारही मानले.
First Published: Friday, December 16, 2011, 13:03