सनी लिऑन 'कंडोम' आणि 'द्राक्ष' - Marathi News 24taas.com

सनी लिऑन 'कंडोम' आणि 'द्राक्ष'

www.24taas.com, थायलंड
 
एफएचएम  मॅगझीनसाठी टॉपलेस झाल्यानंतर पॉर्न स्टार सनी लिऑन आता नव्या रंगात दिसून येईल,  जे की तिच्या नव्या कंडोमच्या जाहिरातीशी निगडीत आहे. मॅनफोर्सच्या कंडोमच्या जाहिरातीसाठी सनी लिऑनचा पहिला फोटो प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सनी एका बागेत फिरताना दिसते आहे, जिथे तिला द्राक्ष दिसतात. आणि ते द्राक्ष खाण्यासाठी तोडते आहे.
 
मुळात ह्या जाहिरातीसाठी शुटींग थायलंडमध्ये करण्यात आलं आहे. सनी लिऑनचं ह्या जाहिरातीबाबत म्हणणं आहे की, मी सांगू इच्छिते की, प्रत्येकांने सेफ सेक्स करावा आणि यालाच प्रमोट करण्यासाठी कंडोमच्या जाहिराती सारखं दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही. सनी लिऑनची ही जाहिरात लवकरच टीव्ही आणि वर्तमानपत्रात दिसणार आहे.
 
सनीच्या मते, कंडोम फक्त एडस सारख्या महाभयंकर रोगापासून बचाव करतो असचं नाही तर नको असलेली गर्भधारणेलाही रोखतो.सनीबाबत असं म्हटंल जातं की ती नेहमीच आपल्यासोबत कंडोम ठेवते. जेव्हापासून लॉस एंजिल्समध्ये पॉर्न स्टारच्या परिषदेमध्ये असं जाहीर करण्यात आलं की, कंडोम हे अनिवार्य असेल. तेव्हापासून सनी या नियमाचं काटेकोरपणे पालन करते.
 
सनीने याआधीही सांगितलं आहे की, ती सुरक्षित सेक्स करण्यावर भरोसा करते. त्यामुळे ती आपल्या सोबत कंडोम ठेवणं पसंत करते. त्यामुळेच हॉट कंडोमच्या जाहिरातीतदेखील सुरक्षित सेक्स करण्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे.
 
 
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 12:32


comments powered by Disqus