Last Updated: Wednesday, October 17, 2012, 16:07
www.24taas.com, मेलबर्नएका नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की गायीच्या दूधापासून सहज एक असं क्रीम बनू शकतं, जे एचआयव्हीसारख्या घातक रोगापासून माणसाला वाचवू शकतं.
मेलबर्न विश्वविद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ मारिट क्रामस्की यांनी यासंदर्भात खुलासा केला. ते म्हणाले, “जेव्हा गर्भार गायींना एचआयव्ही प्रोटिनचं इंजक्शन देण्यात आलं, तेव्हा तिने उच्च क्वालिटीचं दूध दिलं. या दुधामुळे नवजात वासराचं कुठल्याही आजारापासून संरक्षण होऊ शकतं.”
या गायीने वासराला जन्म दिल्यावर जे पहिलं दूध दिलं त्या दुधाला कोलोस्ट्रम म्हटलं गेलं. हेरॉल्ड सन या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार शास्त्रज्ञ आता पुढील योजनेवर काम करत आहेत. या दुधाचं क्रीम बनवण्याआधी या दुधाचा प्रभाव आणि सुरक्षितता यांचं परीक्षण केलं जाईल. हे क्रीम स्त्रियांना पुरूषांवर विश्वास न ठेवता संभोग केल्यास जे एचआयव्ही विषाणू शरीरात शिरतात, त्या विषाणूंपासून रक्षण करतात.
First Published: Wednesday, October 17, 2012, 16:07